Sunday, November 13, 2016

माझी पुस्तक जुगलबंदी -- वंशवृक्ष (डॉ. एस. एल. भैरप्पा) आणि ONE INDIAN GIRL (Chetan Bhagat) !

मी तस खूप काही पुस्तकं वाचतो अस नाही.  पण बरेचदा कुणी मित्रान suggest केल किंवा एखाद्या आवडत्या विषयाच पुस्तक मिळाल तर जरूर वाचतो.  + ऑफिस ला बस नी जायला (आणि यायला) रोज एक - दीड तास लागतो, ह्या वेळेचा सदुपयोग म्हणून कधी फेबु तर कधी पेपर वाचन.  बरेचदा पुस्तक.  मराठी, इंग्रजी दोन्ही..

गणपती च्या वेळी डोंबिवली ला गेलो असतांन्नाआनंद मोरे ला भेटायचा योग आला.  आनंद माझा फेबु मित्र.  त्याच्या पोस्ट वाचून आणि फेबु वर चर्चा करून लगेच कळत की ह्याच प्रचंड वाचन आहे.  आनंद चांगलाच popular आहे आणि मस्तच लिहितो.  बहुदा ३० min बोललो असू आम्ही.  माझ संघाच सौख्य त्याला माहित होत.  आम्ही बोललो पण ह्याच विषयावर.  आनंद म्हणाला तुला डॉ. एस. एल. भैरप्पा आवडतील, जरूर वाच.  त्यानी मग मला काही पुस्तकांची नाव पण suggest केलीत.

-- पुढच्या पुणे ट्रीप मधे मी वंशवृक्ष, पर्व आणि आवरण ही पुस्तक घेतली.
-- त्याच दरम्यान चेतन भगत च नवीन पुस्तक ONE INDIAN GIRL आल.  Amazon आणि Flipkart रु १००/- च्या आस-पास घरपोच देत होते.  म्हटल "सत्यात मजा", घेऊ हे पण.  वाचून बघू नाही आवडल तर सोडून देऊ :-)

वंशवृक्ष वाचायला सुरुवात केली होती आणि दोन दिवसात ONE INDIAN GIRL पण मिळाल.  म्हटल हे पण थोड वाचून बघू.  आणि इथे माझ्या "पुस्तक जुगलबंदी" ला सुरुवात झाली.

वंशवृक्ष

ONE INDIAN GIRL

ONE INDINA GIRL deliver झाल तेव्हा उत्सुकता म्हणून जरा चाळल, इंटरेस्टिंग वाटल :-)

पुढचे १० - १५ दिवस दोन्ही पुस्तक आलटून-पालटून वाचत होतो.  प्रयोग मजेदार वाटला.  दोन्ही लेखक छान पैकी "story teller" आहेत.  दोन्ही पुस्तकान्नी मला बरच काही शिकवल.

वंशवृक्ष, १९६५ -- छानच आहे !  भैरप्पा खूप सुंदर गोष्ट सांगतात.  स्वातंत्रोत्तर काळच चित्रण असावं.  इंग्रजांचा उल्लेख नाही पण मैसूर च्या वाडियार राजांचा उल्लेख आहे.  श्रोत्री त्यांची सून (कात्यायनी), सदाशिवराव, त्यांचा भाऊ राज आणि इतर सगळी पत्र खूप छान रंगवली आहेत.  परत तत्वज्ञाय ही फार सोप्या भाषेत हाताळल आहे.  ग्यान किंवा डोस वाटत नाही, पात्रांच्या अनुभवातून उलगडत जात.  मला पुढील उतारे खूप मार्मिक वाटले आणि माझ्यासाठी ते ह्या पुस्तकाच सार किंवा गाभा असावेत...

कसली भारी प्रगल्भता (maturity) आहे बघा !

--- श्रोत्री: "सगळ आपल्या मनाप्रमाणे घडत तर मग संसार कशाला म्हणायचं ?"

--- श्रोत्री: "ज्याचा जेवढा ऋणानुबंध असेल तेव्हडे दिवस तो आपल्या बरोबर रहात असतो.  तो ऋणानुबंध संपला की दूर जाण अटळ असत.  काहीजण मृत्यूमुळे दूर जातात, तर काहीजण जिवंतपणीच दुरावतात. आपण त्याचा तसाच स्वीकार करायला हवा, नाही का ?"

--- श्रोत्री: "माझ्या मुलाचा ऋणानुबंध संपला आणि तो नदीत बुडून माझ्यापासून दुरावला.  माझी पत्नी आजाराच निमित्त होऊन माझ्यापासून दूर गेली.  त्यांचा मी कसा तिरस्कार करू ?  ते दोघ मृत्यूमुळे माझ्यापासून दूर गेले आणि ती (सून) जिवंत असताना दुरावली एव्हडाच माझ्या दृष्टीन फरक.  माझ्याबरोबरचा ऋणानुबंध संपला.  ती निघून गेली.  त्यात तिचा तरी काय दोष ?"

--- श्रोत्री: "पण स्वतःच्या उदरात नऊ महिने वाढवलेल्या मुलाला सोडून जाताना तिलाही दु:ख झाल असेलच ना ?  त्या दु:खावर मात करणारी नैसर्गिक शक्ती त्यावेळी प्रबळ ठरली !  यालाच आपण माया म्हणतो, नाही का ?  या जगात प्रकृति-सहज गुणधर्मांनी जगायचं ठरल की त्या प्रकृतीविरुद्ध उभ रहाण अतिशय कठीण असत.  ती ह्याला बळी पडली ह्यात काहीच आश्चर्य नाही.  या कारणासाठी तिचा तिरस्कार करण योग्यही नाही."

-- श्रोत्री: "जे घडून गेलय ते पुन्हा पुन्हा आठवून काय मिळणार ? ..... तरीही मी शक्यतो घडून गेलेल्या घटनांची उजळणी करत बसत नाही."

--- सदाशिवराव (स्वगत): "श्रोत्रींनी स्वतःच्या जीवनात मानसिक द्वंद्व निर्माण होण्यासारखं एकही कृत्य न केल्यान त्यांना अस जगण शक्य होत असावं !

आता विचार किती स्पष्ट आहेत ते बघा आणि विचार पद्धती किती समतोल (balanced) !

--- श्रोत्री: "तुमच्या जागी मी असतो तर असा वागलो असतो अस आज सांगण योग्य नव्हे, अस मला वाटत.  तुम्ही तुमच्या एका इतिहासाच्या तासाच्या वेळी वर्गात सांगितलेली गोष्ट परवा चिनी सांगत होता- एका साधून राजाला म्हटल, 'मी तुझ्यासारखा चक्रवर्ती असतो तर असा रक्तपात केला नसता.'  त्यावर तो राजा उत्तरला, 'मी तुझ्यासारखा साधू असतो तर युद्धाचा विचारच माझ्या मनात आला नसता.'

--- श्रोत्री: "ग्रंथनिर्मितीसाठी तुम्ही दुसरा विवाह केलात अस तुम्ही म्हणता.  ग्रंथनिर्मिती हा बुद्धीशी संबंधीत विषय आहे.  बुद्धीतत्व ही प्रकृतीची एक अवस्था आहे.  बुद्धीच कारण सांगून त्यासाठी दुसर लग्न करण हा ही प्रकृतीच्या आकर्षणाचाच एक भाग !  केवळ शारीरिक आकर्षणापोटी केलेल्या विवाहापेक्षा हे उत्तम असल तरी त्यात मुलभूत फरक नाही, अस मला वाटत.  खर ज्ञान ही बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे.  त्यसाठी कुणाच्याही सहाय्याची गरज नाही हृदयाची सच्ची हाक तीव्र असली की पुरेस आहे."

--- श्रोत्री: "बदललेल्या सामाजिक चौकटीत विवाहाचा उद्देश बदलत असल्याच दिसत.  हे योग्य आहे की अयोग्य हा वेगळाच मुद्धा आहे.  आपल्याला कळत वा नकळत केलेला विवाह, त्या दुसऱ्या जिवाची काहीही चूक नसताना कसा कमी महत्वाचा ठरेल ?'  आपल वैवाहिक जीवन आठवण श्रोत्री पुढ म्हणाले, 'मलाही काही वेळा तुमच्या सारख वाटत होत.  मी सतत संस्कृत ग्रंथांच्या अध्ययनात बुडालेला आणि माझ्या बायकोला संस्कृतचा गंध ही नव्हता.  वेदांतावर चिंतन करत मी अनेक ग्रंथांची पारायण करत होतो आणि माझ्या बायकोला कन्नडमध्ये चार ओळीच पत्रही लिहिता येत नव्हत.  तरीही ती मोठ्या भक्तिभावान पतीची सेवा करत होती.  देवपूजेसाठी फुलं आणून देत होती.  गंध उगाळत होती.  तीन वंशवृक्षसाठी एक मूलही दिल.  बौद्धिक पातळीवर तिचा आणि माझा काहीही सम्बंध नसला तरी ती उत्तम धर्मपत्नी होती."

--- श्रोत्री: "तुमच्या जागी मी असतो तर असा विचार करण योग्य नव्हे, तसच त्याच्या विरुद्धही विचार करण फारस योग्य नव्हे.  प्रत्तेकाच्या जीवनदृष्टीवर ते अवलंबून असत.  कधी कधी एका मार्गान चालताना अपरिहार्यपणे द्वंद निर्माण होत.  पण त्या रस्त्यावर पुढे गेल्यावर माघारी वळण्याच ठरवल तर त्याहून वेगळ द्वंद्व जन्म घेईल."

--- सदाशिवराव: "द्वितीय पत्नी द्विपत्नित्वाच्या विरुद्ध आहे.  एका घरात एकाच वेळी दोन बायकांबरोबर एका पुरुषान पती म्हणून रहाण तिला तिरस्करणीय वाटत.  हेही एक आधुनिकतेच मुख म्हणा हव तर !"

--- श्रोत्री: "त्यांचे विचार सर्वस्वी चुकीचे आहेत अस नव्हे.  पण तुमची पहिली पत्नी हयात असताना त्या तुमच्याशी लग्न करायला ज्या विशिष्ट ध्येयासाठी तयार झाल्या, त्याच ध्येयसाधनेला संपूर्ण महत्व देऊन त्या मनातला तिरस्कार थोडा कमी करू शकल्या असत्या, नाही का ?  व्यक्ती किंवा समाजाच्या जीवनाच्या प्रत्तेक जीवनपद्धतीचा स्वतःचा असा विशेष उपयोग असतो.  आपण विशिष्ट संधर्भात त्या जीवनपद्धतीला किती महत्व द्यायचं याचा प्रत्तेकान विचार करायला हवा.  जिवनाच मूळ ध्येय स्पष्टपणे उमजलं असेल तर प्रत्तेक जीवनपद्धतीला नेमक किती महत्व द्यायचं ते आपोआपच उमजत."

वंशवृक्ष-१

वंशवृक्ष-२

वंशवृक्ष-३

वंशवृक्ष-४

वंशवृक्ष पुस्तकावर आधारित सिनेमा ही निघाला आहे आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

आता चेतन भगत च्या ONE INDIAN GIRL कडे बघू.  बर्याच लोकान्ना चेतन भगत आवडत नाही.  खूप लोकान्ना आवडतो ही.  त्याच्या पुस्तकांवर सिनेमा बनायला लागल्यापासून तो सिनेमा साठीच पुस्तक लिहितो अस मला ही वाटत.  त्याची Revolution 2020 आणि Half Girlfriend ही पुस्तक मला सिनेमाच्या गोष्टीच वाटल्या.  पण चेतन भगत सुद्धा खूप चांगला story teller आहे !

इथे सुद्धा एक भारी पैकी हुशार, actually खूप हुशार नाईका आहे.  खूप खूप अभ्यास केल्यामुळे तिला अमेरिकेत एका लय भारी कंपनीत नौकरी मिळते.  पुढे हिची नौकरी + खूप सारी मेहेनत + ऑफिस बाहेरच तीच आयुष्य लेखकांनी खूप छान रंगवल आहे.  एकेठिकाणी प्रेमासाठी रग्गड पैसा आणि समाधान देणारी आणि खूप आवडणारी नौकरी सोडायला सुद्धा ती तयार असते.

मग अमेरीका ते हॉन्ग कॉन्ग ते लंडन असा तिचा प्रवास.  मग तीच गोव्यात लग्न.  इथे "कहानी मे ट्वीस्ट".  आणि मग तिचे विचार किती स्पष्ट आहेत ते बघा !

There are fundamental things about both of you that won't change.

Radhika to Debu: Debu, you say you will be supportive, but the fact that you couldn't handle even a bit of my success means it's an intrinsic part of you.  You can't change that.  And I plan to be a lot more successful than what you saw.  So, sorry, no."

Radhika to Neel: And Neel, you are amazing, no doubt.  The chartered plane, tempting, of course.  Now with the divorce & everything I know you love me too.  But you know what, you love only half of me.  My other half is Kusum, the women you left.  You want a party girl.  Someone young, who allows you to cling on to your youth.  The same youth you work so hard in the gym for.  Well, I won't be this young girl forever.  I don't know what Neel Gupta will do with me then.  He likes Radhika, his young vice president, but will he like Radhika, the diaper-changing wife & mom ?

ONE INDIAN GIRL